राहुल गांधींचा मुंबई दौरा - काँग्रेसच्या बैठकीत राडा

By Admin | Updated: January 12, 2016 18:36 IST2016-01-12T18:17:41+5:302016-01-12T18:36:34+5:30

राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत घेतलेल्या काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात किरकोळ धक्काबुक्की झाली आहे . कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी १५, १६ जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Rahul Gandhi's visit to Mumbai - Rada in Congress meeting | राहुल गांधींचा मुंबई दौरा - काँग्रेसच्या बैठकीत राडा

राहुल गांधींचा मुंबई दौरा - काँग्रेसच्या बैठकीत राडा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ -  राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत घेतलेल्या काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात किरकोळ धक्काबुक्की झाली आहे . कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी १५, १६ जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत राहूल गांधीनी आपल्या भागात भेट द्यावी म्हणून  संजय निरुपम-गुरुदास कामत गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.  नसीम खान आणि अस्लम शेख यांच्यातही बाचाबाची झाल्याचं वृत्त आहे. 
या भांडणामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आल्याचे चित्र दिसते आहे. 

 

Web Title: Rahul Gandhi's visit to Mumbai - Rada in Congress meeting