शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:51 IST

BJP Counterattacks On Rahul Gandhi: राजुरा मतदारसंघातील मतचोरीवरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपाने पलटवार केला असून, राहुल गांधींचा वोट चोरी आरोपाचा कांगावा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ चा प्रत्यक्ष पुरावा आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

मतचोरीवरून आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज कर्नाटकमधील आळंद आणि महाराष्ट्रातील राजूरा मतदारसंघात झालेल्या मतचोरीवरून गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, राजुरा मतदारसंघातील मतचोरीवरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपाने पलटवार केला असून, राहुल गांधींचा वोट चोरी आरोपाचा कांगावा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ चा प्रत्यक्ष पुरावा आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. तसेच राहुल गांधी आणि त्यांच्या पोलिटिकल पिलावळीनेच मतदार नोंदणीत बोगस नावे घुसवून आयोगाची दिशाभूल केली नाही ना, अशी शंकाही उपाध्ये यांनी  उपस्थित केली. 

केशव उपाध्ये म्हणाले की, राहुल गांधींचा वोट चोरी आरोपाचा कांगावा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ चा प्रत्यक्ष पुरावा आहे. कर्नाटकातील आरोपाचे नाटक पुरते पडले आणि महाराष्ट्रातील मतदानाच्या नावाने थयथयाट करून मतदारांचा अपमान करत देशाला मूर्ख बनविण्याचा बनावही उघडा पडला.

निवडणूक आयोगाच्या आव्हानास सामोरे जाण्याऐवजी तोंड लपवून पोरकटपणा करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या पोलिटिकल पिलावळीनेच मतदार नोंदणीत बोगस नावे घुसवून आयोगाची दिशाभूल केली नाही ना, याची चौकशी करण्याची आता आम्हीच मागणी करत आहोत, असेही केशव उपाध्ये म्हणाले. 

चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात संगणकाद्वारे मतदार नोंदणी करण्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून कोणा टोळक्याने मोठ्या प्रमाणात मतदारांची बोगस नावे घुसविल्याचा संशय भारतीय जनता पार्टीने निवडणुकीआधीच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारीद्वारे व्यक्त केला होता.

बोगस मतदार घुसविण्याचा प्रकार जेथे घडल्याचे राहुल गांधी म्हणतात तेथे अशा टोळ्यांना अगोदरच कामाला लावले असण्याची शक्यता आता गडद झाली आहे. म्हणूनच बोगस मतदान किंवा व्होट चोरीच्या राहुल गांधींच्या आरोपामागील षडयंत्र शोधून काढण्यासाठी तपासाची सुरुवात तेथूनच व्हावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र