राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 07:01 IST2018-06-12T07:01:38+5:302018-06-12T07:01:38+5:30

भिवंडी न्यायालयात दाखल मानहानी दाव्यावर मंगळवारी सुनावणी असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहतील.

 Rahul Gandhi today in Bhiwandi court | राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात

राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात

भिवंडी : भिवंडी न्यायालयात दाखल मानहानी दाव्यावर मंगळवारी सुनावणी असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहतील.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्टÑीय स्वयंसेवक संघावर आरोप केला. या प्रकरणी त्यांच्याविरोधात रा. स्व. संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी गैरहजर असताना त्यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी महात्मा गांधी यांची हत्या ही ऐतिहासिक केस असल्याने सबळ पुरावा, वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी समन्स ट्रायल प्रक्रियेद्वारे ही याचिका चालवावी, अशी मागणी केली आहे. याबाबत, मंगळवारी कोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे. सुनावणी भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.ए. शेख यांच्या कोर्टात होणार आहे.

Web Title:  Rahul Gandhi today in Bhiwandi court