शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : "राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही, लिहिलेलं वाचतात"; फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 21:43 IST

फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कारागृहात गेले नसते, तर शेकडो लोकांनी आत्महत्या केली असती, शेकडो लोक वेडे झाले असते.

 स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे एक असे एकमेव स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचे प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीने होत आहे. रोज खोटे बोलायचे, रोज चुकीचे सांगायचे आणि निर्लज्जपणे वागायचे, हे जे काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी करत आहेत, त्यांना महाराष्ट्रातील जनताच उत्तर देईल. याच वेळी राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही,  असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होते. राहुल शेवाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही -फडणवीस म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कारागृहात गेले नसते, तर शेकडो लोकांनी आत्महत्या केली असती, शेकडो लोक वेडे झाले असते. पण त्या सर्वांना त्या काल कोठडीतही बंड करण्याचा धीर आणि हिंमत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली. त्यामुळे मला वाटते, की हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात, त्यांना कुणी तरी लिहून देतो. त्या राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही. लिहिलेलं वाचतात. 'तीन चार साल वो रहे', अरे या वेड्यांना एवढंही माहीत नाही, की ते किती वर्ष कारावासात होते? त्यामुळे मला वाटते, की आपण यांना उत्तर द्यायला हवे आणि ते उत्तर आपण देऊ, हा विश्वास मी तुम्हाला देतो.

 हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज...-आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदूत्वाचा विचार आहे, या हिंदूत्वाच्या विचाराचा जो धागा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहीत होते, की हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज आपली जातीव्यवस्था, वर्णभेद संपवून एकत्रित होणार नाही, जोवर येथील हिंदू समाज मजबूत होत नाही. कारण त्यांना इतिहास माहीत होता, की जोवर येथील हिंदू समाज मजबूत होता संघटित होता तोवर यावर आक्रमण करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. अनेक आक्रमणे परतवून लावण्याचे काम या देशाने केले. 

पण, हा हिंदू समाज जेव्हा दुर्बल झाला. ज्यावेळी अपराध बोधाने हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीत आणि वर्णावर्णात हा हिंदू समाज विभागला गेला, त्यानंतरच कधी मोगलांनी, कधी इंग्रजांनी आपल्या आधिपत्याखाली ठेवले. म्हणून जरी स्वातंत्र्य मिळले तरीही, हा हिंदूसमाज मजबूत नसेल, जो या देशाचा आत्मा आहे. आत्माच नसेल, तर देश कसा राहणार? हा आत्मा जर मजबूत नसेल, तर हा देश पारतंत्र्यातच जाईल आणि म्हणून एकीकडे हिंदू समाजाला एकत्रीत करण्याचे कामही सावरकरांनी केले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस