मेडिकलच्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न

By Admin | Updated: December 6, 2015 01:56 IST2015-12-06T01:56:57+5:302015-12-06T01:56:57+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शुक्रवारी मध्यरात्री मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न झाला.

Raging attempt on a medical student | मेडिकलच्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न

मेडिकलच्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शुक्रवारी मध्यरात्री मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रयत्न झाला. त्यास नकार दिल्यावर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण केली.
जयंत तोंडे (२०, रा. मूळ गाव पाथर्डी, अहमदनगर) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याने महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये संशयित रुपेंद्रसिंग सुमितराय, राहुल मीना, राहुल चाजोर्निया, जितेंद्र वर्मा, निनाद भालेराव, हेमंत चव्हाण आदींनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीच्या निर्णयानुसार या संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. जयंतला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे क्लासबंद आंदोलन
पहिल्या वर्षात शिकणाऱ्या सुमारे १४० विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता रामानंद यांची भेट घेतली. यावेळी जोपर्यंत दोषींवर सक्त कारवाई होत नाही, तोपर्यंत क्लासमध्ये एकही विद्यार्थी बसणार नाही, अशी भूमिका घेत निवेदन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Raging attempt on a medical student