राधे माँपासून जीवाला धोका - डॉली बिंद्रा

By Admin | Updated: August 13, 2015 09:08 IST2015-08-13T09:01:49+5:302015-08-13T09:08:36+5:30

एकेकाळी राधे माँची भक्त म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री डॉली बिंद्राने आता याच राधे माँ पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Radhe mother's life risk - Dolly Bindra | राधे माँपासून जीवाला धोका - डॉली बिंद्रा

राधे माँपासून जीवाला धोका - डॉली बिंद्रा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - स्वयंघोषित देवी राधे माँ हिच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एकेकाळी राधे माँची भक्त म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री डॉली बिंद्राने आता याच राधे माँ पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 
'राधे माँ आणि तिच्या माणसांपासून माझ्या जीवाला धोका असून त्यांच्याकडून धमकीचे फोन व मेसेजेस येतात' असे डॉलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांना याबाबत आणखी माहिती सादर करेन असेही ती म्हणाली. डॉलीने मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांना पत्र लिहीत आपल्यासह कुटुंबियांनाही सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान राधे माँ हिच्यासह एकाच कुटुंबातील एकूण सात जणांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा नोंदवला. निकी गुप्ता या ३२ वर्षांच्या विवाहित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार राधे माँच्या सांगण्यावरून सासरची मंडळी हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होती.
 

Web Title: Radhe mother's life risk - Dolly Bindra