लाचखोर तलाठ्याला अटक

By Admin | Updated: September 1, 2015 01:48 IST2015-09-01T01:48:39+5:302015-09-01T01:48:39+5:30

एक हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथील तलाठ्याला अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी रनाळा तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली

Racket Bunker arrested | लाचखोर तलाठ्याला अटक

लाचखोर तलाठ्याला अटक

नंदुरबार : एक हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथील तलाठ्याला अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी रनाळा तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
रनाळे येथील एका शेतकऱ्याने वडीलोपार्जित शेतजमिनीवरील आई व बहिणीचे नावे कमी करून जमिनीचा सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी तलाठी अनिल लिंबा भावसार यांनी शेतकऱ्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती.
शेतकऱ्याने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचून त्याला पकडण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Racket Bunker arrested