शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जनावरांसाठी लसीची खरेदी :प्रधान सचिवांचे आक्षेप डावलून उपसचिवांचा सल्ला मानला

By अतुल कुलकर्णी | Published: January 22, 2018 4:18 AM

मुंबई : तीन वेळा जी कंपनी तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरली, त्याच कंपनीला काम देण्याची निविदा प्रक्रिया पूर्णपणे सदोष असून यात गंभीर चुका आहेत, असा लेखी आक्षेप प्रधान सचिव विजयकुमार यांनी घेतलेला असताना, उपसचिव रवींद्र गुरव यांचे मत ग्राह्य धरत, मंत्री महादेव जानकर यांनी एफएमडी लस खरेदीस मान्यता दिल्याचे समोर आले ...

मुंबई : तीन वेळा जी कंपनी तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरली, त्याच कंपनीला काम देण्याची निविदा प्रक्रिया पूर्णपणे सदोष असून यात गंभीर चुका आहेत, असा लेखी आक्षेप प्रधान सचिव विजयकुमार यांनी घेतलेला असताना, उपसचिव रवींद्र गुरव यांचे मत ग्राह्य धरत, मंत्री महादेव जानकर यांनी एफएमडी लस खरेदीस मान्यता दिल्याचे समोर आले आहे. याबाबत विचारले असता, प्रधान सचिवांना त्यातील काही माहिती नव्हते, असे विधान जानकरांनी केले.राज्यातील दोन कोटी मुक्या जनावरांना एफएमडीची लस देण्यासाठी अक्षम्य दिरंगाई केली गेली, हे ‘लोकमत’ने प्रकाशित करताच राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमची जनावरे लाळ्या खुरकत (एफएमडी) आजाराने मेल्यास, त्याची भरपाई सरकार करणार की स्वत:ला शेतकºयांचे कैवारी समजणारे मंत्री जानकर, असे सवाल शेतक-यांनी उपस्थित केले आहेत.लस खरेदीसंबंधीची निविदा प्रक्रिया सदोष आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रधान सचिव विजयकुमार यांनी तातडीने चर्चा करावी, असा शेरा फाइलवर मारला होता. त्यानुसार, उपसचिव व अन्य अधिका-यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, अधिका-यांच्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने, विजयकुमार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत या सगळ्या गैरप्रकाराची पानभर नोट लिहिली.इंडियन इम्युनॉलॉजिकल्स कंपनीची व्यावसायिक निविदा सार्वजनिक झाल्यानंतर, ती रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली. त्यानंतरही ज्या कंपनीला आधी अपात्र ठरवण्यात आले होते, त्याच कंपनीला तांत्रिक दृष्टीने पात्र ठरविले गेले. त्यामुळे ही सगळी पद्धतीच सदोष झाली आहे. ही सगळी प्रक्रिया विभागाचे सचिव विकास देशमुख यांनी स्वत:च्या उपस्थितीत पार पाडली असल्याने, याचा निर्णय मंत्र्यांनीच घ्यावा, असे सांगत, विजयकुमार यांनी देशमुख यांच्या कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.एवढे सगळे झाल्यानंतरही मंत्री जानकर यांनी उपसचिव गुरव यांचे म्हणणे ग्राह्य धरत, प्रधान सचिवांचे म्हणणे खोडून काढले व बायोवेट कंपनीला काम देण्यास मान्यता दिली. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीव्र आक्षेप घेतले. नऊ महिन्यांत पाचव्यांदाकेली गेलेली निविदा प्रक्रिया चुकीची आहे. बायोवेटमुळे जनावरांना गाठी होतात व ते तडफडून मरतील, शेतकºयांच्या जिवाशी सरकारनेअसा खेळ मांडू नये, असे सांगणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. हा विषय विधि व न्याय विभागाकडून मंजूर करून घेण्याच्या खटपटी चालू आहेत. जर असे झाले, तर आपण यायालयात जाऊ, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.खरेदीची प्रक्रिया ही उद्योग विभागाच्या मान्यतेने व त्यांनी काढलेल्या आदेशामुळे होत असते, त्यामुळे आमचे मत विचारात न घेता, परस्पर विधि व न्याय विभागाकडे जाणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत, उद्योग विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाºयाने नोंदविले आहे.ती लस जानकरांना टोचा-इंजेक्शन दिल्यावर आपल्यालाही गाठ येते, असे बेजबाबदार विधान करणारे मंत्री महादेव जानकर यांनीच स्वत:ला ती लस टोचून घ्यावी, असा टोला राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला आहे.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरAjit Pawarअजित पवार