पुण्याच्या उपमहापौरांच्या मुलावर बलात्कारप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: December 27, 2015 00:39 IST2015-12-27T00:39:48+5:302015-12-27T00:39:48+5:30

उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलावर विनयभंग, बलात्कार, चोरी व शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलासह आणखी दोघे जण

Pune's Deputy Mayor's offense against rape | पुण्याच्या उपमहापौरांच्या मुलावर बलात्कारप्रकरणी गुन्हा

पुण्याच्या उपमहापौरांच्या मुलावर बलात्कारप्रकरणी गुन्हा

पुणे : उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलावर विनयभंग, बलात्कार, चोरी व शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलासह आणखी दोघे जण या गुन्ह्णात आरोपी आहेत. याबाबत एका ३८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
अमित बागुल, कपिल बागुल, तनुजा भागवत-रावळ आणि महादू अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डिसेंबर २०११ मध्ये अमित बागुलने काशी यात्रेचे आयोजन केले होते. वाराणसी येथे पोहोचल्यानंतर संबंधित महिलेच्या खोलीत बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी अमितने दिली होती. अमित, कपिल आणि तनुजा यांनी पीडित महिलेला एका कॅफेमध्ये बोलवून तक्रार मागे घेण्याची धमकी दिली होती. दरम्यान, पीडित महिलेविरुद्ध या पूर्वी काही अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. (प्रतिनिधी)

हे राजकीय षडयंत्र : बागुल
ज्या महिलेने हा आरोप केला तिचे वय व मानसिक तपासणी केल्यानंतर, यातील सत्य बाहेर येईल. माझा राजकीय उत्कर्ष सहन होत नसलेल्यांने मला बदनाम करण्यासाठी केलेले हे कारस्थान आहे, असा दावा उपमहापौर आबा बागुल यांनी केला आहे.
सदर महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आपली काहीही तक्रार नाही, असे तिने पोलिसांना लिहून दिले होते. असे असताना आता ती पुन्हा बिनबुडाचे आरोप करीत आहे, यावरून तिच्या हेतूविषयी शंका येत आहे, असेही बागुल म्हणाले.

Web Title: Pune's Deputy Mayor's offense against rape