पुण्यात तब्बल ८२ दुचाकी जाळल्या, १ संशयित ताब्यात

By Admin | Updated: June 28, 2015 11:42 IST2015-06-28T11:38:36+5:302015-06-28T11:42:31+5:30

काही समाजकंटकांनी पुण्यातील सिंहगड रोडवरील सनसिटी भागातील तब्बल ८२ दुचाकींसह ५ चारचाकी गाड्या जाळल्याची घटना घधडली असून पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले आहे.

In Pune, a total of 82 bicycles were burnt, 1 suspect arrested | पुण्यात तब्बल ८२ दुचाकी जाळल्या, १ संशयित ताब्यात

पुण्यात तब्बल ८२ दुचाकी जाळल्या, १ संशयित ताब्यात

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.. २८ -  काही समाजकंटकांनी पुण्यातील सिंहगड रोडवरील सनसिटी भागातील तब्बल ८२ दुचाकींसह ५ चारचाकी गाड्या जाळल्याची घटना आज पहाटे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिहंगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी भागात अज्ञात व्यक्तींनी रविवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान जाळपोळ केल्याचे वृत्त आहे. त्यात ८२ दुचाकी व काही चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या. एकाच भागाच एकाच वेळी जाळपोळ होऊन लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. 
या घटनेमुळे परसिरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 

Web Title: In Pune, a total of 82 bicycles were burnt, 1 suspect arrested