‘पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम जून २०१७ पर्यंत करणार’
By Admin | Updated: August 5, 2016 01:39 IST2016-08-05T01:39:50+5:302016-08-05T01:39:50+5:30
शिरवळ ते शिवापूरपर्यंतच्या रस्त्याचेच काम बाकी असून जुन २०१७ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल

‘पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम जून २०१७ पर्यंत करणार’
मुंबई : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहेत. यातील शिरवळ ते शिवापूरपर्यंतच्या रस्त्याचेच काम बाकी असून जुन २०१७ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेते दिली.
मुणे-सातारा महामार्गाचे काम रखडले असल्याबाबतची लक्षवेधी सूचना राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी मांडली होती. या महामार्गाचे काम रिलायन्स्कडे सोपविण्यात आली होती. त्यांनी ती अन्य काही कंपन्यांकडे सोपविली. काम पूर्ण झाले नसतानाही तब्बल २७ कोटींची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप पावसकर यांनी केला.
उत्तर देताना पाटील म्हणाले की, या महार्गावरील १४० पैकी ११० कामे पूर्ण झाली आहेत. मागार्साठी भूमी संपादीत करताना स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्यामुळे कामांना विलंब होत आहे. रिलायन्सला हा महामार्ग सहापदरी करण्याचे काम देण्यात आले होते; मात्र या आस्थापनाने विविध ठेकेदारांना काम दिल्यामुळे रस्त्यावरची अनेक कामे प्रलंबित आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार आपण त्या कंत्राटदारांकडे विचारणा करू
शकत नाही.
तसेच काही ठिकाणी विद्युत खांबे हटविण्याचे काम प्रलंबित आहे. या महामार्गावर आकारण्यात येणाऱ्या पथकराविषयी उपस्थित करण्यात आलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, या महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा पथकर आकारण्यात येत आहे. या मार्गाच्या सहापदरी करणाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सहापदरी मागार्चा पथकर आकारण्यात येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.