शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पुणे-नाशिक कॉरिडॉरला 1546 हेक्टरची गरज, एमएसआरडीसीतर्फे पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 09:45 IST

Pune-Nashik Corridor : पुणे ते नाशिक पट्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. या महामार्गासाठी १,५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. 

 मुंबई - पुणे ते नाशिक पट्ट्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. या महामार्गासाठी १,५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. 

पुणे आणि नाशिकदरम्यान १८९.६ किमीच्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करणार आहे. त्यासाठी १७ हजार ५३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतून हा कॉरिडॉर जाणार आहे. या महामार्गाचा पुणे ते शिर्डी असा १३४ किलोमीटरचा, तर शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज असा ६० किमीचा मार्ग हा चेन्नई-सुरत महामार्गाचा भाग असेल. त्यापुढे चेन्नई-सुरत महामार्ग ते नाशिक असा निफाड राज्य महामार्गाचा १८ किलोमीटरचा रस्ता असेल. 

या महामार्गावर ३७ किमीचे जोडरस्तेही होणार आहेत. त्यामध्ये भोसरी येथे ३.६७ किमीचा, रांजणगाव येथे २३.६३ किमीचा, शिर्डी येथे ८.७९ किमी, एनएच ६०ला भागवत मळा येथे ०.९१ किमी जोडरस्ता प्रस्तावित आहे. महामार्गाच्या उभारणीनंतर पुणे, नाशिक आणि मुंबई हा औद्योगिक त्रिकोण जवळ येणार आहे. तसेच पुणे-नाशिक प्रवास  पाच तासांवरून दोन ते अडीच तासावर येणार आहे. 

महामार्गावर ११ बोगदे या महामार्गासाठी १५४६ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील १४२९.७१ हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे, तर ५३.६४ हेक्टर जमीन सरकारी आहे. तसेच ६२.२४ हेक्टर क्षेत्र वनजमिनीचे आहे. यातील मुख्य मार्ग ५४ गावांमधून जाणार असून, कनेक्टर २९ गावांतून जाईल. या मार्गावर ११ बोगदे प्रस्तावित आहेत. तसेच ७ मुख्य पूल आणि ६० वायडक्टही प्रस्तावित आहेत.  

    पुणे-नाशिक प्रवास अडीच तासांवर.    राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहराजवळून जाणार.    महामार्गालगत मोठे कारखाने, उद्योग, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्र विकसित करण्याचा उद्देश.    पुणे-नाशिक प्रवास ५ तासांवरून २ ते अडीच तासांवर येणार.

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिकPuneपुणे