शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक ५ हजार कोटींचे अन् थकबाकी ३ हजार ५३१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:05 IST

महापालिकेचे हक्काचे उत्पन्न असलेल्या कर संकलन, जाहिरात फलक शुल्क, बांधकाम शुल्क, पाणी पट्टी शुल्क पोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देकेंद्र, राज्य शासनाच्या अनुदानाबरोबरच विविध विभागांच्या थकबाकीचा समावेश कर आकारणी व करसंकलन विभागाची सर्वाधिक तब्बल २ हजार २९६ कोटी रुपयांची थकबाकी

पुणे : महापालिकेचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत असल्याने निधी कमी पडतो म्हणून अनेक विकास कामांना, सर्वसामान्य नागरिकांच्या योजनांना कात्री लावणा-या महापालिकेत तब्बल ३ हजार ५३१ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून येणा-या अनुदाना बरोबरच महापालिकेच्या विविध विभागांच्या थकबाकीचा समावेश आहे.  राज्य आणि केंद्र शासनाकडून येणा-या अनुदानची थकबाकी, महापालिकेच्याच कर, जाहिरात फलक शुल्क, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी थकबाकी, मोबाईल टॉवर, व विविध न्यायालयीन प्रकारणांमुळे थकलेल्या रक्कमेची सविस्तर माहिती नगरसेवक अविनाश बागवे यांनी प्रशासनाला विचारलेल्या लेखी प्रश्नांमुळे ही माहिती समोर आली आहे.  महापालिकेला राज्य शासन व केंद्र शासनाकडून मार्च २०१८ अखेर पर्यंत एकूण तब्बल ३९२.७० कोटी रुपयांचे अनुदान येणे बाकी आहे. राज्य शासनाकडून सन २०१४-१५ मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे १४ कोटी १५ लाख ५९ हजार रुपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. रस्ता, व्यवसाय, करमणूक कर अनुदाना पोटी देखील मोठी थकबाकी शासनाकडून आहे. रस्ता अनुदानाचे ३६.५० कोटी, व्यवसाय कर - ९२ लाख आणि करमणूक कर ६० लाख रुपये अद्याप शासनाकडून महापालिकेला मिळालेले नाही. महापालिकेचे हक्काचे उत्पन्न असलेल्या कर संकलन, जाहिरात फलक शुल्क, बांधकाम शुल्क, पाणी पट्टी शुल्क पोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक तब्बल २ हजार २९६ कोटी रुपयांची थकबाकी एकट्या कर आकारणी व करसंकलन विभागाची आहे.  जाहिरात शुल्कापोटी ३५ कोटी रुपये तर पाणी पट्टीची थकबाकी तब्बल ५१८.१६ कोटी रुपये आहे. याशिवाय विविध प्रकरणांमध्ये न्यायालयात दावे असलेल्या प्रकरणांची संख्या देखील मोठी असल्याचे महापालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरांमध्ये स्पष्ट झाले आहे.-------- कराची थकबाकी : २ हजार ३९६ कोटी- पाणी पट्टी थकबाकी : ५१८.१६ कोटी- शासनाकडे थकीत अनुदान : ३९२.७० कोटी

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAdvertisingजाहिरातTaxकर