धनगर आरक्षणासाठी पुणे-मुंबई दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:31 IST2018-02-19T04:31:19+5:302018-02-19T04:31:21+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या, या मागणीसाठी पुण्याहून १२ मार्चला अहिल्यादेवी दिंडी या पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune-Mumbai Dindi for Dhanagar reservation | धनगर आरक्षणासाठी पुणे-मुंबई दिंडी

धनगर आरक्षणासाठी पुणे-मुंबई दिंडी

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या, या मागणीसाठी पुण्याहून १२ मार्चला अहिल्यादेवी दिंडी या पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर १४ मार्चला ही दिंडी येणार असल्याचे आयोजक हेमंत पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणावर अनेक नेत्यांनी राजकारणच केले. मी स्वत: तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्यानंतरही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. म्हणून सरकारला जाब विचारण्यासाठी अहिल्यादेवी दिंडीचे आयोजन केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढणाºया सर्व संघटना व संस्थांनी या दिंडीत सामील व्हावे. पुण्यातील अहिल्यादेवी प्रतिष्ठान, सातारातील यशवंतरावजी होळकर संघ व कासे येथील गझी ढोल पथकाने आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. इच्छुकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Pune-Mumbai Dindi for Dhanagar reservation