शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे अव्वल; बघा मुंबई, ठाण्याचा कितवा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 17:34 IST

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून यादी जाहीर

मुंबई: देशातील जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुण्यानं अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. जगण्यालायक शहरांच्या यादीत नवी मुंबईनं दुसरं स्थान मिळवलं आहे. जगण्याच्या दृष्टीनं सर्वात योग्य असणारी देशातील पहिली तीन शहरं महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यानं ही यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत देशाची राजधानी दिल्ली 65 व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश जगण्यायोग्य असलेल्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. पुणे, नवी मुंबई आणि मुंबईनं पहिले तीन क्रमांक पटकावल्यावर या यादीत ठाण्यानं सहावा क्रमांक मिळवला आहे. मात्र उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि कोलकात्यामधील एकाही शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळालेलं नाही. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या राजधान्यांचा समावेशदेखील पहिल्या दहा शहरांच्या यादीत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर या यादीत सातव्या, तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ दहाव्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरला जगण्यायोग्य शहरांच्या यादीत आठवं स्थान मिळालं आहे. केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास केवळ चंदिगडला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवण्यात यश आलं आहे. चंदिगडला पाचवा क्रमांक मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि विजयवाडा ही शहरंदेखील पहिल्या दहांमध्ये आहेत. त्यांना अनुक्रमे चौथा आणि नववा क्रमांक मिळवण्यात यश आलं आहे. देशातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून जगण्यायोग्य शहरांची यादी प्रसिद्ध केली जाते. शहरातील संस्था, प्रशासन, मूलभूत सुविधांचा दर्जा लक्षात घेऊन जगण्यायोग्य शहरांची यादी तयार केली जाते.  

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई