शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला घरच्याच शेतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 10:13 IST

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय तरूणीचा मृतदेह नग्नावस्थेत घरच्या शेतात सापडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धामणे गावात घडली आहे.

ठळक मुद्दे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय तरूणीचा मृतदेह नग्नावस्थेत घरच्या शेतात सापडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धामणे गावात घडली आहे. तरूणीच्या मृतदेहाच्या बाजूला रक्ताने भरलेला दगडही सापडला आहे.

पुणे- तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय तरूणीचा मृतदेह नग्नावस्थेत घरच्या शेतात सापडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धामणे गावात घडली आहे. तरूणीच्या मृतदेहाच्या बाजूला रक्ताने भरलेला दगडही सापडला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. सोमवारी दुपारी शेत नांगरण्यासाठी गेलेल्या मुलीच्या भावाला तिचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी पीडित तरूणी तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. तेव्हापासूनच ती बेपत्ता होती. 'मीड डे'ने यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

माझ्या मुलीने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर ती मला शेतीच्या कामासाठी मदत करत होती. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत ती आमच्यासोबत शेतात होती. नंतर कॉलेजमधील प्रवेशासंदर्भातील माहिती घेण्यासाठी ती तिच्या शाळेच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. त्यानंतर ती शेतात परतलीच नाही. आमच्या शेजाऱ्यांनी तिला संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आमच्या घराच्याजवळ पाहिलं होतं. त्यानंतर तिला कुणीही पाहिलं नाही, अशी माहिती पीडित तरूणीच्या आईने दिली आहे. 

शुक्रवारी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर चाकण पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पीडित तरूणीच्या भावाने तिचा मृतदेह पाहिला आणि आम्हाला याबद्दलची माहिती दिली. मृतदेहापासून 200 मीटर अंतरावर आम्हाला रक्ताने माखलेला दगड सापडला आहे. तरूणीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने हत्या केली असावी, असा आम्हाला संशय आहे, अशी माहिती चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरिक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली आहे. 

दरम्यान, तरूणीचा मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिसPuneपुणे