शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

"आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणं आवश्यक", प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 20:36 IST

Prakash Ambedkar News: एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पुणे  - आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणे गरजेचे आहे. आपण कोणत्याही पक्षात असाल, तर तिथे ओबीसींना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत आपण १०० चा आकडा गाठत नाही, आणि हा आकडा आपण गाठत नसू तर ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

एसटी व ओबीसी या समाजासाठी सध्या महाराष्ट्रात जी आरक्षणासाठी अराजकता माजली आहे यासंदर्भात आरक्षण बचाव यात्रा गुरूवारी ४ वाजता समताभूमी , फुले वाडा, गंज पेठ आली. यावेळी आरक्षण बचाव संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आंबेडकर बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणाहून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे.

ही यात्रा गुरुवारी पुण्यात आली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य ज्येष्ठ नेते वसंतस साळवे, उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग, अविनाश भोसिकर, पुणे शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, विद्यार्थी आघाडीचे नागेश भोसले, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि भाजप हे ब्राह्मण आणि कायस्थ यांचे प्रतिनिधी आहेत.जरांगे पाटील यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी कायदेशीर नाही, असे कोणी म्हणत नाही. तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवू नका. ही मंडळी फसवणूक करणारी असल्याची टीका ॲड. आंबेडकरांनी प्रस्थापित नेत्यांवर केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBC Reservationओबीसी आरक्षणreservationआरक्षणPuneपुणे