पुणे: बालेवाडी दुर्घटनेप्रकरणी चौघांना अटक
By Admin | Updated: July 30, 2016 09:15 IST2016-07-30T09:14:33+5:302016-07-30T09:15:10+5:30
पुण्यातील बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून ९ जण ठार झाल्याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे: बालेवाडी दुर्घटनेप्रकरणी चौघांना अटक
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३० - पुण्यातील बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून ९ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आहे, मात्र या प्रकल्पाचे मालक व बिल्डर अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पार्क एक्स्प्रेस जॉईंट व्हेंचरचे प्रोजेक्ट इन्चार्ज भाविन हर्षद शहा, ज्ञानेश्वर चव्हाण, आर्किटेक्ट संतोष सोपान चव्हाण, स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रदीप कुसुमकर आणि हंसल पारिख अँड असोसिएट्स यांना अटक केली आहे.
महापालिकेने बारा मजल्यांचीच परवानगी दिलेली असताना कायदा धुडकावत तेराव्या मजल्याचे बेकायदा बांधकाम या ठिकाणी सुरू करण्यात आले. तेराव्या मजल्याचा स्लॅब भरत असतानाच ही दुर्घटना घडली. तेथे काम करणाऱ्या मजुरांमध्ये ठेकेदार आणि सुपरवायझरचे नातेवाईकही होते. या सोसायटीच्या आधीच्या इमारतींचे बांधकाम झालेले आहे. मात्र, ही दुसरी फेज हाती घेण्यात आली होती. साधारणपणे दीड वर्षापूर्वी या फेजचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या इमारतीचा पहिला स्लॅब ऑक्टोबर २०१५ मध्ये पडला होता.