पुण्यात पाच मजली इमारत कोसळून २ अडकल्याची भीती
By Admin | Updated: October 31, 2014 09:17 IST2014-10-31T09:17:11+5:302014-10-31T09:17:24+5:30
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एक पाच मजली इमारत कोसळून ढिगा-याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

पुण्यात पाच मजली इमारत कोसळून २ अडकल्याची भीती
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३१ - पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एक पाच मजली इमारत कोसळून ढिगा-याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
ही इमारत नुकतीच बांधण्यात आली होती, मात्र गुरूवारी इमारतील थोडे तडे गेल्याने ती झुकली होती. त्यामुळे काही रहिवासी इमारतीतून बाहेर पडले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तीनच मजल्यांची परवानगी देण्याच आलेली असतानाही पाच मजल्याचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले अशी माहिती समोर येत आहे.