सीए उमेश शर्मा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन , जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:26 IST2017-12-10T04:25:55+5:302017-12-10T04:26:08+5:30
सीए उमेश शर्मा लिखित ‘जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’, या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लासूर स्टेशन येथे आ. प्रशांत बंब आयोजित मोफत आरोग्य शिबिरादरम्यान प्रकाशन झाले.

सीए उमेश शर्मा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन , जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सीए उमेश शर्मा लिखित ‘जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’, या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लासूर स्टेशन येथे आ. प्रशांत बंब आयोजित मोफत आरोग्य शिबिरादरम्यान प्रकाशन झाले.
जीएसटीवरील कायद्याच्या या पहिल्या पुस्तकामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ एकात्मिक वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ जीएसटीअंतर्गत कर कसा मोजावा? अधिसूचनांची यादी, जीएसटी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न आदी महत्त्वाच्या बाबींच्या समावेश आहे. या ६०० पानी पुस्तकाची मूळ किंमत ५०० रु. असून, यातून येणारे मानधन उमेश शर्मा हे सीए करणाºया होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून देणार आहेत.
व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, जलसंपदामंत्री डॉ. गिरीश महाजन, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, साकेत भांड आदींची उपस्थिती होती.