हातांची नस कापून घेत मंदिराला प्रदक्षिणा

By Admin | Updated: June 19, 2017 01:37 IST2017-06-19T01:37:31+5:302017-06-19T01:37:31+5:30

पंधरा वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला व पाच महिन्यांपूर्वी परतलेल्या मनोरुग्ण इसमाने अत्यंत विचित्र पद्धतीने स्वत: आयुष्य संपविले.

Proximity to the temple by cutting the veil of hands | हातांची नस कापून घेत मंदिराला प्रदक्षिणा

हातांची नस कापून घेत मंदिराला प्रदक्षिणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंधरा वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला व पाच महिन्यांपूर्वी परतलेल्या मनोरुग्ण इसमाने अत्यंत विचित्र पद्धतीने स्वत: आयुष्य संपविले. सुभाष रामराव डोईफोडे (५८) यांनी रविवारी पहाटे हातांच्या नसा कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत स्वत:ला पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेतच त्यांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या. गंभीर भाजलेल्या डोईफोडे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जेलरोड भागातील आविष्कार अपार्टमेंटमधील डोईफोडे यांनी विचित्र पद्धतीने आत्महत्या केली. घरातील सर्व झोपलेले असताना डोईफोडे यांनी हातांची नस कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर गणपती मंदिर गाठले. मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि रक्ताचे शिंतोडे मंदिराच्या परिसरात उडविले. गंभीर जखमी झालेल्या डोईफोडे यांचा मृत्यू झाला. दोन्ही हातांच्या नसा कापून व गुप्तांगाला जखमी करून घेत डोईफोडे यांनी स्वत:ला पेटवून घेतले. त्यांच्या नातेवाईकांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र डोईफोडे मंदिराच्या दिशेने पळाले. आग भडकल्याने कोणीही त्यांच्याजवळ गेले नाही. मंदिराला प्रदक्षिणा घालताना ते जळालेल्या अवस्थेत कोसळल्याचे फिर्यादित म्हटले आहे. डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
डोईफोडे यांची मानसिक स्थिती ढासळलेली होती तसेच भोंदूगिरी करणाऱ्या काही बुवा-बाबांच्याही ते
संपकर् ात आले होते, असाही संशय पोलिसांना आहे.

Web Title: Proximity to the temple by cutting the veil of hands