लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात पुढील सहा महिन्यांनंतर होणारे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-प्रमाण या पोर्टलवर संरक्षित करण्यात येणार असून, बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता ग्राहकांना दस्त क्रमांकाच्या आधारे कर्ज मिळू शकणार आहे. यासह ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून या दस्ताबाबत सर्व कार्यवाहीची नोंद होणार आहे. त्यामुळे एकाच मालमत्तेवर दोन बँकांकडून कर्ज घेता येणार नाही. तसेच दस्ताबाबत होणाऱ्या सर्व कार्यवाहीचा इतिहास या तंत्रज्ञानातून ठेवला जाणार आहे. त्यातून संबंधित मालकाचीही फसवणूक टळणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रायोगिक प्रयोग सातारा जिल्ह्यात राबविला असून, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता याची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे.
दस्त नोंदणी मुद्रांकच्या पोर्टलवर संरक्षित या पध्दतीने ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आलेले दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या पोर्टलवर संरक्षित करण्यात येतील. दस्त ब्लॉकचे चेन प्रणालीत टाकून या दस्तासंदर्भात पुढील सर्व कार्यवाहीची नोंद ठेवली जाणार आहे. तयार करण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. यासाठी सुमारे साडेसहा कोटींचा खर्च येणार आहे.
दस्ताशी छेडछाड होत नाही बँकेने कर्ज दिल्यानंतर त्याची नोंद, मालकी हक्कात बदल झाल्यानंतर फेरफारद्वारे सातबारा उतारा व मालमत्ता पत्रकात होणारी नोंद तसेच काही कारणास्तव मालमत्ता वादग्रस्त झाल्यास बँकेकडून अथवा तपास यंत्रणांकडून मालमत्तेवर येणारी टाच याचीदेखील नोंद या ब्लॉकचेन तंत्रज्ञानात होणार आहे. दस्तामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांचीदेखील नोंद यात ठेवली जाणार आहे. त्यामुळे सदनिका अथवा जमीन मालकाची फसवणूक टळणार आहे.
ही प्रणाली सातारा जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर येत्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी राज्यस्तरावर होणार आहे. आहे. दस्ताचा गैरवापरदेखील टळणार आहे.रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक, पुणे.
Web Summary : Maharashtra introduces e-pramaan portal, enabling banks to verify document authenticity via registration number. Blockchain technology records all transactions, preventing fraud and single property multiple loans. A successful pilot in Satara paves the way for statewide implementation, enhancing transparency and security.
Web Summary : महाराष्ट्र ई-प्रमाण पोर्टल शुरू करता है, जिससे बैंक पंजीकरण संख्या के माध्यम से दस्तावेज़ की प्रामाणिकता सत्यापित कर सकते हैं। ब्लॉकचेन तकनीक सभी लेनदेन रिकॉर्ड करती है, धोखाधड़ी और एकल संपत्ति पर कई ऋणों को रोकती है। सतारा में एक सफल पायलट राज्यव्यापी कार्यान्वयन का मार्ग प्रशस्त करता है, पारदर्शिता और सुरक्षा बढ़ाता है।