शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

CoronaVirus रेशनमधून तेल, डाळ, साखरही मिळणार?; आमदारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 6:57 AM

मजुरांना दिलासा द्या, केशरी कार्डधारकांनाही धान्य द्या, सर्वपक्षीय आमदारांची मागणी, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी होत असून या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आमदारांनी रेशन दुकानांमधून खाद्यतेल, डाळ, साखर व चहाचाही पुरवठा करावा अशी एकमुखी मागणी केली आहे. बांधकाम व संघटित क्षेत्रातील मजुरांची कामेच बंद असल्याने त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे म्हणून त्यांना तत्काळ आर्थिक मदत करा, असेही आमदारांनी म्हटले आहे.रेशन दुकानांमधून पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आधी नियमित धान्य विकत घ्यावे लागेल अशी अट राज्य सरकारने टाकली आहे. एवढेच नव्हे तर तीन महिन्यांचा तांदूळ एकाच वेळी न देण्याचे ठरवले आहे. बऱ्याच आमदारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विनाअट मोफत तांदूळ देण्यात यावा अशी भूमिका त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.केवळ पिवळे कार्डधारकांना धान्य वाटप करून चालणार नाही तर तेवढ्याच प्राधान्याने केशरी कार्डधारकांनादेखील रेशन दुकानांमधून धान्य द्या, अशी आमदारांची भावना आहे.बांधकाम मजुरांच्या हक्काचा साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी शासनाकडे जमा आहे, त्यातून त्यांना निदान दोन हजार रुपये द्यावेत असा आग्रह आमदारांनी धरला. राज्यात किमान २० जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा हजारो हेक्टरमधील पिकांना मोठा फटका बसला असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणीही या आमदारांनी केली.विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, डॉ. संजय कुटे, अमित झनक, भारत भालके, अनिल बाबर, प्रणिती शिंदे, रणधीर सावरकर, पंकज भोयर, सचिन कल्याणशेट्टी, विकास ठाकरे, प्रशांत बंब, डॉ. तुषार राठोड, किशोर जोरगेवार,राजूभाऊ एकडे आदी आमदारांनी या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणतात आमदार?स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था शासनाने करावी.

आदिवासी भागात खावटी योजना सुरू करावी.सगळीकडे गहू कापणीला आहे. गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीन पंजाबमधून आणल्या जातात. यावेळी त्या पोहोचणे शक्य नसल्याने गहू कापणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सरकारने मार्ग काढावा.द्राक्ष ,केळी या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कारण बाजारपेठ नाही अशा वेळी सरकारने मदत देण्याची गरज आहे.भाजीपाला किराणा लोकांना घरपोच मिळावा यासाठी तत्काळ यंत्रणा उभी करावी.मंत्रिमंडळ बैठक होणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी सायंकाळी ५ ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. बहुतेक मंत्री हे सध्या त्यांच्या गृहजिल्ह्यात आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस