शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसच्या औषध पुरवठ्याची त्वरित माहिती द्या, उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:47 IST

mucormycosis : प्रत्येक राज्यात असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनुसार या आजारावरील औषधाचे सम प्रमाणात वाटप करण्यात येते की नाही, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.

मुंबई : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांना किती प्रमाणात औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत तपशिलात माहिती देण्याचे मंगळवारी निर्देश दिले.प्रत्येक राज्यात असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनुसार या आजारावरील औषधाचे सम प्रमाणात वाटप करण्यात येते की नाही, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. म्युकरमायकोसिस संदर्भात केंद्र सरकारने नागरिकांनी काय करायचे व काय करायचे नाही, याबाबत सूचना द्या आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली.राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायलयाला सांगितले की, १ जूनपर्यंत राज्यात ५,१२६ रुग्ण होते. राज्यभरातील ४२ सरकारी रुग्णालये आणि ४१९ खासगी रुग्णालये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. हाफकिनच्या मदतीने राज्य सरकार काळ्या बुरशीवरील औषधांचे ४०,००० लसींची निर्मिती करत आहे. राज्यात नागपूर, पुणे, औरंगाबाद, सोलापूर नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण अधिक आहेत, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.सध्याच्या परिस्थितीत देशात २८,२५२ म्युकरमायकोसिसचे रुग्ण असल्याची माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी यावेळी न्यायालयाला दिली. महाराष्ट्रात काळ्या बुरशीचे रुग्ण अधिक असल्याने पुरेशा प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर सिंग यांनी आतापर्यंत महाराष्ट्राला ९१,००० लसीच्या कुप्या देण्यात आल्याची माहिती दिली.

पाच टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात'महाराष्ट्रात औषधांचा तुटवडा आहे. एकूण रुग्णांपैकी पाच टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. अन्य राज्यांत किती रुग्ण आहेत? त्यामुळे एकूण औषध उत्पादनाच्या पाच टक्के औषध महाराष्ट्राला मिळाले पाहिजे,' असे न्यायालयाने म्हटले. अन्य राज्यांत किती रुग्ण आहेत? आणि किती औषध पुरवठा करण्यात आला आहे, हे आम्हाला दाखवा, असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसCourtन्यायालय