शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानस्पद! ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या लेकींचा रोबोट जाणार अमेरिकेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:57 IST

शहरातील समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर मुंबईला नुकतीच स्पर्धा घेण्यात आली

- नीतीन गव्हाळे

अकोला : खेड्यातून आलेल्या १४ जणी. शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील. मराठी माध्यमात शिकणाऱ्या; परंतु शिक्षण घेण्याची धडपड. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द. यातूनच जन्म घेतला, समाजोपयोगी स्वयंचलित रोबोटने! या रोबोटने मुंबई येथील राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत चार फेऱ्यांमध्ये देशभरातील २०० चमूंना मागे टाकत तब्बल तीन पुरस्कार पटकावले. मनूताई कन्या शाळेच्या त्या १४ जणी आता अमेरिकेला जाण्यासाठी सज्ज आहेत.

मुंबई लिगो एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या फर्स्ट लिगो लीगमध्ये ‘शहरातील समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर मुंबईला नुकतीच स्पर्धा घेण्यात आली. त्यात इयत्ता आठवी व नववीत शिकणाºया १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यांनी छोट्या पार्ट्सचा वापर करून अत्यंत कल्पकतेने रोबोट बनवला. त्याचे डिझाइन, प्रोग्रॅमिंगदेखील स्वत:च बनवले. या विद्यार्थिनींनी ‘रोप स्विंग अ‍ॅक्सिडेंट प्रिव्हेंशन’ हा संशोधन प्रकल्पसुद्धा लीगमध्ये सादर केला.शाळेने काढली मिरवणूक

या सर्व विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. छोट्या गावांमधून येणाऱ्या विद्यार्थिनींकडे ऑटोरिक्षाने शाळेत यायलासुद्धा पैसे नसतात. बऱ्याचदा या विद्यार्थिनी पायीच शाळेत येतात. येथील शिक्षकांनी या विद्यार्थिनींची वाजतगाजत जंगी मिरवणूक काढली. बेस्ट टीमवर्क व देशातून निवडलेल्या ४० चमूंमधून ऑल ओव्हर चॅम्पियन अ‍ॅवॉर्डसुद्धा पटकावले. त्यांच्या मार्गदर्शक काजल राजवैद्य यांना बेस्ट मेन्टॉरचा पुरस्कार मिळाला.या आहेत, विजेत्या विद्यार्थिनी

रुचिका मुंडाले (रिधोरा), निकिता वसतकार (रिधोरा), स्नेहल गवई (अकोला), अर्पिता लंगोटे (रिधोरा), सानिका काळे (अकोली खु.), गौरी झामरे (खडकी टाकळी), आंचल दाभाडे (सोमठाणा), पूजा फुरसुले (अकोली बु.), सायली वाकोडे (रिधोरा), अंकिता वजिरे (भोड), समीक्षा गायकवाड (उमरी), प्रांजली सदांशिव (खडकी टाकळी), गायत्री तावरे (भौरद), प्रणाली इंगळे (सोमठाणा)

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाRobotरोबोटAkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र