सोलापूर येथील घटनेचा निषेध; उल्हासनगर तहसीलदारांना निवेदन, कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 18:13 IST2021-08-23T18:12:08+5:302021-08-23T18:13:45+5:30
सोलापूर बोरगाव येथील मातंग जातीच्या सरपंचाच्या भावाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा निषेध शहर मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने करून तहसीलदार यांना सोमवारी दुपारी निवेदन दिले.

सोलापूर येथील घटनेचा निषेध; उल्हासनगर तहसीलदारांना निवेदन, कारवाईची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : सोलापूर बोरगाव येथील मातंग जातीच्या सरपंचाच्या भावाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा निषेध शहर मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने करून तहसीलदार यांना सोमवारी दुपारी निवेदन दिले. पुरोगामी राज्याला ही काळिमा फासण्याची शक्यता असल्याचे मत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर शहर मानवहित लोकशाही पक्षाचे वतीने, सोलापूर बोरगाव गावाचे सरपंच यांचा भाऊ धनाजी साठे यांचे निधन झाले. मात्र गावच्या स्मशानभूमी मध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. अखेर समाजाने व सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहावर ग्रामपंचायत कार्यालय समोर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकाराचा राज्यातून निषेध व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध म्हणून शहर मानवहित पक्षाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी पक्षाचे सचिन साठे यांनी केली. अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्या नुसार संपूर्ण गावकऱ्यांवर व पोलीस प्रशासनावर कारवाई होऊन त्यांना अटक झाली पाहिजे. अशी अश्या घोषणा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिल्या.