शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

सुरक्षारक्षकांची पिळवणूक

By admin | Updated: June 10, 2016 01:42 IST

सरकारी तसेच निम्न सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये सर्रासपणे खासगी ठेकेदारी तत्त्वावर सुरक्षारक्षक नेमले जाते आहेत.

पिंपरी : सरकारी तसेच निम्न सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये सर्रासपणे खासगी ठेकेदारी तत्त्वावर सुरक्षारक्षक नेमले जाते आहेत. त्यांना नाममात्र वेतन देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक होत असून, त्यांची नोंदणी पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे केली नाही. यामुळे मंडळाकडे ३ टक्के लेव्ही जमा केली जात नसल्याने मंडळाचा म्हणजेच शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे ४ लाखांपेक्षा अधिक सुरक्षारक्षक, गार्ड, वॉर्डन आहेत. एकूण ३५०पेक्षा अधिक खासगी एजन्सी आहेत. खासगी कंपन्या, संस्था, सरकारी, निम्न सरकारी अणि स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षारक्षक नेमले जात आहेत. महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ व त्या अंतर्गत योजना २००२च्या योजना खंड २५ (१) (२) नुसार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केल्यानंतर त्यांची नोंदणी मंडळात करण्याचे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, तसे केले जात नाही. मोठमोठ्या कंपन्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत महापालिका व नगर परिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड, महावितरण, रुग्णालय आदी आस्थापनांत एकूण संख्येपैकी केवळ नाममात्र सुरक्षारक्षकांची नावे मंडळात नोंदविली जातात. शहरातील एका नामवंत कंपनीत एकूण ४३० सुरक्षारक्षक नेमलेले असताना केवळ ३० जणांनी नोंदणी मंडळाकडे करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड व पुणे पालिकेतही सर्वच सुरक्षारक्षकांची नोंदणी होत नाही. ठेकेदार प्रत्येक सुरक्षारक्षकाची प्रति महिना ३ टक्के लेव्ही भरत नाही. नावापुरते काही सुरक्षारक्षकांची नोंद केली जाते. परिणामी, शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. ठेकेदार ही रक्कम आपल्याकडे ठेवून सुरक्षारक्षक, संबंधित कंपनी किंवा संस्था आणि शासनाची आर्थिक फसवणूक करीत आहे. या संदर्भात मंडळाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. कारवाईचे केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्यात धन्यता मानली जाते. (प्रतिनिधी)>सुविधांकडे दुर्लक्ष : किमान वेतन न देता लूटसुरक्षारक्षकांना किमान वेतन १६ हजार २६२ रुपये आहे. मात्र, ५ ते १० हजार रुपये वेतन देऊन त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यांना भविष्यनिर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा, गणवेश, बूट, धुलाई भत्ता आदी लाभ दिले जात नाहीत. अनेक महिने वेतन न देता त्यांना तंगवले जाते. वेतन नसल्याने आर्थिक अडचणीमुळे नोकरी सोडून देण्याशिवाय त्याकडे पर्याय राहत नाही. या संदर्भात मंडळाकडे तक्रारी करूनही गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने सुरक्षारक्षक नाइलाजास्तव दुसरीकडे नोकरी शोधतात. पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे नोंदणी केलेल्या आस्थापनाकडे नेमण्यात येणाऱ्या सुरक्षारक्षकांची नोंदणी मंडळाकडे होते. शासनाने एक्झमशन केलेल्या आस्थापनांमध्ये मंडळाचे सुरक्षारक्षक नेमावे लागतात. इतर ठिकाणी हा नियम लागू होत नाही. नोंदणीकृत आस्थापनातील सुरक्षारक्षकांची नियमितपणे नोंदणी केली जाते. त्यांना सर्व सुविधा आणि सेवा वेळेवर पुरविल्या जातात. - रत्नदीप हेंद्रे, सहायक आयुक्त, पुणे विभाग पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने ठरवून दिलेल्या किमान वेतन दरानुसार महापालिकेतील सुरक्षारक्षकांना वेतन दिले जाते. किमान वेतनात बदल झाल्यास तसा बदल केला जातो.- चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी, महापालिका