शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण , विधानसभेत विधेयकास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:24 AM

मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विशेष प्रतिनिधी नागपूर : मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.आतापर्यंत १ जानेवारी २००० पर्यंतच्याच झोपड्यांना अधिकृत मान्यता होती. पंतप्रधान आवास योजनेत २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची योजना आहे. मात्र, केवळ २००० पर्यंतच्याच झोपड्यांना संरक्षण असल्याने पुनर्विकासासाठी केवळ ३० टक्केच झोपड्या पात्र ठरत होत्या. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या अनेक योजना रखडल्या होत्या. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.पंतप्रधान आवास योजनेचाही मिळेल लाभ-२०११ पर्यंतच्या ज्या झोपड्यांचा पुनर्विकास केला जाईल त्यातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतील आर्थिक लाभ दिला जाईल. त्यापेक्षा अधिकचे बांधकाम मूल्य (कन्स्ट्रक्शन कॉस्ट) हे झोपडीधारकांस भरावे लागेल.२०११ पर्यंतच्या कोणत्या झोपड्या आहेत हे प्रमाणित करण्याचे अधिकार मुंबईत एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना असतील. त्यांनी मान्यता दिलेल्या झोपडपट्टयांचाच पुनर्विकास केला जाईल.आकडेवारी उपलब्ध-२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासंबंधीचे महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास विधेयक गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सभागृहात मांडले.२०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यावर्षीची संबंधित सर्व आकडेवारी अधिकृतपणे उपलब्ध असल्याने त्या वर्षापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.झोपडीधारकास आहे त्याच ठिकाणी किंवा तसे शक्य नसेल तर जवळच्या जागेवर पुनर्विकास योजनेत घर मिळेल. बांधकाम होईपर्यंत त्यांच्या निवासाची व्यवस्था संक्रमण शिबिरात केली जाईल व ते शक्य नसेल तर भाडे/नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. संक्रमण शिबिरातील गाळ्याचे क्षेत्रफळ किमान १२० चौरस फूट असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर