सरकारी खरेदीअभावी कोसळले तुरीचे भाव!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:29 IST2018-12-26T06:28:51+5:302018-12-26T06:29:01+5:30

तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली

 Prosperity of a government purchase failed! | सरकारी खरेदीअभावी कोसळले तुरीचे भाव!  

सरकारी खरेदीअभावी कोसळले तुरीचे भाव!  

मुंबई : तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली असून त्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे.
केंद्र्र सरकारने यंदा तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी नाफेडची केंद्रे सुरू झालेली नाहीत. राज्याच्या पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की तूर खरेदी सुरू करावी, असा प्रस्ताव विभागाकडून १५ दिवसांपूर्वीच केंद्र सरकारला पाठविला आहे. केंद्राने प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.
आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन मध्यंतरी सरकारने दिले होते. मात्र, व्यापारी सध्या ४५०० ते ४८०० रुपये दराने बिनबोभाटपणे खरेदी करीत आहेत. तूर साधारणत: डिसेंबरमध्ये बाजारात येते हे वर्षानुवर्षे माहिती असतानाही नाफेडची खरेदी केंद्रे जानेवारीअखेर वा फेब्रुवारीअखेर सुरू केली जातात.
दरम्यान, तुरीला यावर्षी ५,६७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला आहे; पण खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने या दराचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

मुद्दाम विलंब केल्याचा शेतकºयांचा आरोप

गेल्यावेळी १ फेब्रुवारी ते १५ जून २०१८ दरम्यान नाफेडने एकूण ३३ लाख ६५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली होती. यंंदा त्याच्या आधीच खरेदी सुरू होईल, असा विश्वास पणन विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला. नाफेडवर खरेदीचा बोजा येऊ नये म्हणून मुद्दाम खरेदी विलंबाने सुरू केली जाते, असा शेतकºयांचा आरोप आहे.

तुरीला हमीभावापेक्षा कमी दर : यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, बाजारात तुरीचे दर सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर १,२७५ रुपयांनी कमी आहेत.

Web Title:  Prosperity of a government purchase failed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती