प्रगतीचे दावे फोल - तटकरे
By Admin | Updated: March 17, 2016 00:41 IST2016-03-17T00:41:10+5:302016-03-17T00:41:10+5:30
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या अभिभाषणात राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी राज्य सरकारने विविध निर्णय
प्रगतीचे दावे फोल - तटकरे
मुंबई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या अभिभाषणात राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी राज्य सरकारने विविध निर्णय घेतल्याचा केलेला दावा अतिशय चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याची टीका राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना केली.
‘सरकारने एलबीटी माफीची घोषणा केली. त्यासाठी आठ हजार कोटींची तरतूद केली, पण छोट्या महानगरपालिकांना एलबीटीचे अनुदान दिले गेले नाही. त्या सर्व महापालिका आज अडचणीत आहेत. एलबीटीला तुम्ही आठ हजार कोटी देऊ शकता, पण सामान्य शेतकऱ्यांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत,’ असे तटकरे म्हणाले.