शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 16:07 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे.

ठळक मुद्देमोठी यंत्रणा असते राबत : पुणे शहरातून ३२ रेल्वे उत्तर प्रदेश, बिहारला रवाना

पुणे : संपूर्ण देश अचानक लॉकडाऊन केल्याने देशभरातील मोठ्या शहरांमध्ये लाखो कामगार व अन्य नागरिक अडकून पडले़ लॉकडाऊनला ५० दिवस झाल्यानंतर राज्यांनी एकमेकांशी ठरवून या कामगारांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. केवळ पुणे शहरातून आतापर्यंत तब्बल ३२ रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश, बिहारला रवाना झाल्या आहेत. एका रेल्वेगाडीतून जवळपास १४०० प्रवासी जात असतात. पुणे विभागांचे रेल्वे  व्यवस्थापक यांना प्रवाशांची यादी दिल्यानंतर ती मंजूर केली जाते व प्रवासी त्या गाडीत बसून आपल्या गावाला रवाना होतात. मात्र, हे करताना अगोदर एक मोठी प्रक्रिया करावी लागते.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक रेल्वेगाडी सोडण्यासाठी किती मोठा व्याप करावा लागतो, याची कल्पना अनेकांना नसते.पुणे शहराचे समन्वयक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ही सर्व प्रक्रिया किती किचकट आणि प्रचंड मनुष्यबळाची गरज असलेली कशी आहे हे नेमक्या शब्दात सांगितले. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात परप्रांतियांना त्यांच्या गावी जाण्यासाठी यादी करण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीने पोलीस ठाण्यात येण्याऐवजी त्यांनी १५ ते २० जणांचा ग्रुप करुन त्या गटप्रमुखामार्फत सर्वांनी फार्म भरुन घेतले जातात.त्यानंतर त्यांची राज्य व जिल्ह्यानुसार वर्गवारी करुन ते पोलीस उपायुक्तांकडे पाठविले जातात. शहरातील सर्व उपायुक्तांकडे आलेल्या प्रवाशांची यादी एकत्रित केली जाते. त्यानुसार एका राज्यातील विशिष्टभागात जाणारे १४०० प्रवाशांची संख्या झाल्यावर त्यांनी एक स्वतंत्र यादी बनविली जाते. ही यादी संबंधित राज्याच्या नोडल अधिकार्‍यांना पाठविले जाते व त्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात परत येण्याची परवानगी मागितली जाते. त्याच बरोबर ही प्रवाशांची एक यादी स्थानिक रेल्वे अधिकार्‍यांना पाठवून त्यांच्याकडे रेल्वेची मागणी केली जाते. संबंधित राज्याने परवानगी दिल्यानंतर रेल्वेला काही वेळा प्रवासी तारीख कळविले जाते. त्यानंतर रेल्वेकडून विशेष गाडी मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी त्यासाठी लागणारे आवश्यक निधी रेल्वेकडे जमा करतात. त्यानंतर रेल्वे त्यांचे तिकीट इश्यू करण्यास परवानगी देते. हे सर्व झाल्यावर पोलिसांकडून प्रत्येक प्रवाशांना टोकन दिले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वेगाडी कधी सुटणार याची माहिती आधल्या दिवशी कळविले जाते. त्यामुळे या सर्व १४०० प्रवाशांना रेल्वे स्टेशनलाआणण्यासाठी शहरात काही ठिकाणे निश्चित केले जातात. तेथे गाडी सुटण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोलविण्यात येते. पीएमपीच्या साधारण ७० बस गाड्यामधून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घेऊन रेल्वे स्टेशनला येतात. रेल्वे स्टेशनवर रेल्वे कर्मचार्‍यांच्या मदतीने सर्वांकडून टोकन घेऊन त्यांना तिकीट देतात. त्यानंतर सर्व प्रवासीत्यांच्या गावाला रवाना होतात. त्यानंतर पुन्हा गाडी पुण्यातून रवाना झाली असून त्यातून या जिल्ह्यातील इतके प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती संबंधित राज्याच्या नोडल अधिकार्‍याला दिली जाते.

पुणे शहरातून जाणार्‍या प्रत्येक परप्रांतीय प्रवाशांना २ पाण्याच्या बाटल्या, फुड पॅकेट, गुळची ढेप, एक बाटली दुध दिले जाते. सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळून हे सर्व करण्यात पोलिसांचे मोठे मनुष्यबळ त्याकामी लावावे लागते.रेल्वेच्या स्थानिक अधिकार्‍यांना सर्व प्रथम यादी दिल्याशिवाय विशेष श्रमिक एक्सप्रेसचे प्रक्रियाच सुरु होऊ शकत नाही. ही मोठी प्रक्रियअसते. यादी दिल्यानंतर रेल्वेला त्या मार्गावरील सर्व विभागांना त्याचीमाहिती द्यावी लागते व त्यानंतर तिचा मार्ग, त्यावेळची मार्गावरील उपलब्धतता ठरवून मग गाडीची तारीख, वेळ निश्चित केली जाते. त्यामुळे अनेकदा रेल्वे आदल्या दिवशी गाडी कधी सुटणार हे सांगते.

टॅग्स :PuneपुणेMigrationस्थलांतरणrailwayरेल्वेState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेpiyush goyalपीयुष गोयल