शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ऑनलाईन सातबारा उतारे मिळण्यास अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:24 IST

पुण्यासह कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग हे चार जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांची माहिती क्लाऊड स्थलांतरित केली आहे.

ठळक मुद्देक्लाऊडवर जाऊनही दुपारी १२ ते ३ या वेळेत मिळेना गतीसोमवारपासून डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल अशी शक्यता

पुणे: महसूल विभागातर्फे ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत राज्यातील नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने बहुतांश जिल्ह्यांची माहिती क्लाऊडवर टाकली आहे. मात्र, दुपारी १२ ते ३ या कालावधीत डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्यास काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यातील काही अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे सातबारा उतारे डाऊनलोड करताना येणा-या सर्व समस्या दूर झाल्याची खात्री केल्यानंतर पुण्यासह उर्वरित चार जिल्ह्यांची माहिती क्लाऊडवर अपलोड केली जाणार आहे.राज्य शासनातर्फे एप्रिल महिना अखेरीस राज्यातील सर्व जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पुण्यासह कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग हे चार जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांची माहिती क्लाऊड स्थलांतरित केली आहे. मात्र, डिजिटल सातबारा व ई-फेरफारची माहिती क्लाऊडवर स्थलांतरित केल्यानंतरही दुपारच्या वेळी सातबारा उतारे डाऊन लोड होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे पुण्यासह इतर चार जिल्ह्यांची माहिती क्लाऊडवर स्थलांतरित करण्याचे काम थांबविण्यात आले होते. मात्र, पुढील आठवड्यात उर्वरित चार जिल्हे सुध्दा क्लाऊडवर स्थलांतरित होतील,असे महसूल विभागातील अधिका-यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यात सर्व जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित झाल्यापासून नागरिकांना ४५ हजार ८०७ मोफत ‘सातबारा’,१० हजार १४९ मोफत ‘आठ अ’आणि ८ हजार ५९० मोफत फेरफार देण्यात आले आहेत. तसेच १२ लाख ८५ हजार ३७९ शुल्कासह सातबारा उतारे आणि ६ लाख ३१ हजार २८९ ‘आठ अ’ उतारे दिले गेले आहेत. मात्र, दुपारी १२ ते ३ वाजता उतारे डाऊनलोड करण्यास अडचणी येत होत्या. मात्र,आता सर्व त्रुटी दूर करण्यात आले असल्याने उतारे डाऊनलोड करण्यास वेळ लागणार नाही,असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. जानेवारी महिन्यापासून टप्प्या टप्प्याने राज्यातील सर्व जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित करण्यात आली आहेत. मात्र, तरीही नागरिकांना डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु, येत्या सोमवारपासून डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार