शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला

By admin | Updated: September 18, 2014 00:50 IST

मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पलायन केले. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

प्रशासनात खळबळनागपूर : मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पलायन केले. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सूरज श्याम अरखेल, असे या कैद्याचे नाव असून तो वर्धेचा रहिवासी आहे. या कैद्याच्या पलायनामागील कारण मोबाईल असल्याचे कळते. काल रात्री कारागृह अधिकाऱ्यांनी धाड घातली असता त्यांना सूरज अरखेल याच्याजवळ मोबाईल आढळला होता. मोबाईल जप्त करण्यात आला होता. सूरजने अधिकाऱ्यांना विनवणी करून मोबाईल जप्त करा परंतु सिम कार्ड देऊन टाका, असे म्हटले होते. आपले सिमकार्ड परत मिळाले नाही तर जेलमधून पळून जाण्याची धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने त्याला जबरदस्त मारहाण केली होती, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. सूरज अरखेल हा दोन हजार रुपये हप्ता देऊन कारागृहातून मोबाईलचा वापर करीत होता, असेही कळते. रविवारच्या रात्रीही कारागृहातील बड्या गोलमध्ये कारागृह अधिकाऱ्यांनी धाड घालून कैद्यांजवळून १२ मोबाईल जप्त केले होते, असेही सांगितले जाते. कडेकोट सुरक्षा घेरा असताना आणि पळून जाण्याची धमकी दिली असताना हा कैदी आज कारागृहातून कसा काय पळाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कैद्याने कारागृहात कधीही न परतण्याची शपथ घेत आपल्या एका प्रेयसीसोबत पलायन केल्याचेही कळते. (प्रतिनिधी)