भरती प्रक्रियेत बडतर्फ कर्मचा-यांना प्राधान्य!

By Admin | Updated: October 17, 2014 00:37 IST2014-10-16T23:24:11+5:302014-10-17T00:37:30+5:30

डॉ. पंदेकृविच्या कुलगुरूंनी घेतली कुलपतींची भेट.

Priority in the recruitment process to staff! | भरती प्रक्रियेत बडतर्फ कर्मचा-यांना प्राधान्य!

भरती प्रक्रियेत बडतर्फ कर्मचा-यांना प्राधान्य!

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फ कर्मचार्‍यांना नव्याने भरती प्रक्रीया राबवून गुणवत्तेनुसार सेवेत समाविष्ट करण्यास कृषी विद्यापीठ अनुकूल आहे; परंतु याकरिता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाची प्रक्रिया सुरू होण्याची गरज असल्याने, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी कृषी विद्यापीठांचे कुलपती तथा राज्याच्या राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली.
नोकर भरतीत अनियमितता झाल्याच्या पृष्ठभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर ८ ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब केले. त्यानुसार कृषी विद्या पीठ प्रशासनाने वरिष्ठ संशोधन आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावरील या कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश बजावल्याने या कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी न्यायासाठी सवरेच न्यायालयात धाव घेतली होती. ४ एप्रिल २0१४ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. कृषी विद्यापीठाने नव्याने भरती प्रक्रिया राबवून सर्व वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना गुणवत्तेनुसार सामावून घ्यावे, असे आदेश सवरेच न्यायालयाने त्यावेळी सुनावणीदरम्यान दिले होते; परंतु कृषी विद्यापीठाने भरती प्रक्रियाच पूर्ण केली नाही. त्यामुळे बडतर्फीची कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांनी १४ ऑक्टोबर रोजी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात ठिय्या दिला होता. या प्रकरणी कुलगुरू डॉ. दाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे आश्‍वासन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एम. भाले यांनी दिल्याने कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान, डॉ. दाणी यांनी कुलपतींची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी पुन्हा कुलपतींशी चर्चा केली जाणार आहे. कुलपतींशी चर्चा झाल्यानंतर कुलगुरू आणि या कर्मचार्‍यांमध्ये बुधवारी चर्चा झाली असून, या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्‍वासन डॉ. दाणी यांनी कर्मचार्‍यांना दिले आहे.

*भरती मंडळाचा घोळ भोवला
राज्यात महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती निवड मंडळाची स्थापना झाली आहे. या स्थापनेला एक वर्ष उलटले असून, अद्याप या मंडळाचे काम सुरू झाले नसल्याने राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधकांची भरती प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्याचा फटका या ८३ कर्मचार्‍यांनाही बसला आहे.

Web Title: Priority in the recruitment process to staff!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.