शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:51 IST

कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडे आठ कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?"

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यात त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यासंदर्भात बोलताना, "मला वाटते त्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक ओळ छापायची राहून गेली की, आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते. 

कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडेआठ लाख कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?" एवढेच नाही तर, "या पद्धतीने पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाचं नाव पळवून जे काही मिळालं, जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यातून काय साध्य झाले?" असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

"लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली लाडलकी" -लाडकी बहिण योजेवर बोलताना कोल्हे म्हणाले, "आपल्याला तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ठोस माहिती आहे की, यामध्ये लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली होती लाडलकी. लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना, त्याचे बजेटमध्ये हेड आहे का? इथून सुरुवात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची पेन्शनची योजना आहे... योजनेला कुठलाही विरोध नाही. मात्र, वस्तस्थिती काय आहे, याकडे बघणे अत्यंत आवश्यक आहे."

"गेल्या दोन-अडीच महिन्यांत आपण बघितले की, अनेक योजनांचा निधी, हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. यानंतर, काही जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थीर ठेवण्याचे जे आश्वासन देण्यात आले, ते तर एवढे हासयस्पद आहे की, महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. तर मग ते कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थीर ठेवणार आहेत." असा सवालही कोल्हे यांनी यावेळी केला.  

"महायुतीचे हे आश्वास हा केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नाही, हे माहीत असल्याने, वाट्टेल ती आश्वासने द्या, हेच या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसते." असेही कोल्हे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवार