शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान कार्यालयाने घेतली शेतकरी कर्जमाफीमधील घोळाची गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 23:56 IST

 राज्यात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये झालेल्या गोंधळाची गंभीर दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे.

मुंबई -  राज्यात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये झालेल्या गोंधळाची गंभीर दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी श्रीकर परदेशी यांनी राज्याचे सहकार सचिव, कृषी सचिव आणि आयटी सचिवांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत या सर्व प्रकाराबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, बँकांनी नोंदी करताना चुका केल्या, त्याचा फटका पात्र शेतक-यांना बसला. कर्जमाफीच्या याद्या दुरुस्तीचे काम सुरू असून, २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के शेतक-यांना कर्जमाफी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. शेवटच्या शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, यासाठी लक्ष घालत असल्याने अनेकांचा खोटेपणा उघड होत आहे, असेही ते म्हणाले.दिवाळीत कर्जमाफीची प्रमाणपत्रे शेतकºयांना दिली. पण त्यांच्या खात्यात पैसेच गेले नाहीत, हे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले होते. त्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही ६६ कॉलमचा फॉर्म तयार केला आहे. तो भरताना बँकांकडे शेतकºयांचा आधार नंबर नव्हता. नसलेली माहिती भरू नका, असे सांगितले होते. पण तिथे ‘नॉट अ‍ॅप्लिकेबल’ असे लिहिल्याने अर्ज बाद होण्याच्या शक्यतेमुळे काही बँकांनी एकच आधार क्रमांक अनेक शेतकºयांच्या नावापुढे टाकला. काही ठिकाणी नवरा-बायकोचाही एकच आधार नंबर टाकला गेला. ही बाब लक्षात आल्यानंतर कार्यक्रमाच्या आधीच आम्ही त्यात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुरुस्तीही सुरू झाली.शेतकऱ्यांचा संप आणि चहुबाजूंनी विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र