शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

‘2जी’वरून ‘परा’चा कावळा केला, पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 3:27 AM

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ‘परा’चा कावळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.

नागपूर : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ‘परा’चा कावळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.देशातील राजकारणात भूकंप घडविणा-या  2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी दोषमुक्त केले आहे. यावर चव्हाण म्हणाले, मे 2014ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर झाली. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धिमाध्यमांना हाताशी धरून २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला. घोटाळा झालेला नसतानाही तसे असल्याचे दाखवून वातावरण निर्मिती करण्यात आली. त्या काळात अण्णा हजारे यांचे आंदोलन उभे राहिले. डॉ. मनमोहन सिंग यांचे जनतेने ऐकले नाही. त्याची किंमत काँग्रेसला निवडणुकीत मोजावी लागली. काँग्रेस सत्तेपासून दूर गेली आणि भाजपाला फायदा झाला. या प्रकरणाच्या सुनावणीत सत्तापक्ष पुरावे देण्यास अपयशी ठरला. भ्रष्टाचाराचे आरोप हे पुराव्याआधारे सिद्ध होतात, ही बाब भाजपा विसरली. केवळ आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न भाजपाने केला. जनतेने काँग्रेसला फासावर लटकविले. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे चव्हाण यांनी स्पष्टकेले.चव्हाण म्हणाले, विशेष सीबीआय न्यायालयात पुरावे सादर करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. पण पुरावे नसल्यामुळे सरकारला दाखल करता आले नाहीत. आरोप करणे म्हणजे पुरावे समजायचे काय? न्यायालयात खटल्याचा निकाल देण्यासाठी पुरावे लागतात. २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची सुनावणी तब्बल सात वर्षे चालली. मीडिया ट्रायलची शिक्षा मोठ्या पक्षाला बसली.मीडिया ट्रायल-कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी पुढे यावे, असे आवाहन न्यायाधीशांनी केले होते़ तरीही कोणी पुढे आले नाही़ अखेर न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपींना निर्दोष सोडले़ मीडिया ट्रायलची शिक्षा पक्षाला बसली़

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदी2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा