शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाच विभागाच्या ४० योजना आता आॅनलाईन, पालकांनाच भरावे लागणार शिष्यवृत्ती अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 7:32 PM

राज्य शासनाने शिष्यवृत्ती, योजनांमध्ये होणारे अपहार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाच विभागाच्या ४० योजना आता आॅनलाईन केल्या आहेत

अमरावती : राज्य शासनाने शिष्यवृत्ती, योजनांमध्ये होणारे अपहार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाच विभागाच्या ४० योजना आता आॅनलाईन केल्या आहेत. तसेच यंदापासून विद्यार्थी, पालकांनाच शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे लागेल, अन्यथा पाल्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागेल, हे वास्तव आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभागाशी संबंधित ४० योजनांचा कारभार आॅनलाईन करण्यात आला आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी शाळा, महाविद्यालयांमार्फत अर्ज सादर करुन ते शासनाकडे पाठविले जायचे. त्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम किंवा धनादेश विद्यार्थ्यांना दिले जात होते. मात्र, शिष्यवृत्तीत घोेटाळे, अपहार, भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम थेट पालक अथवा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डिबीटी अंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी विद्यार्थी अथवा पालकांना स्वत:च आॅनलाईन अर्ज सादर करावे लागतील. यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आले असून आतापर्यंत २.८३ कोटी आधार नोंदणी झाली आहे. ई-शिष्यवृत्ती, निवृत्ती योजना, शेतकरी आपत्ती व्यवस्थापन योजना देखील डीबीटी अंतर्गत जोडली जाणार आहे.बॉक्सचार हजार ८८६ उमेदवारांना शिष्यवृत्तीराज्य शासनाच्या ‘महा डीबीटी’ संकेतस्थळावर शिष्यवृत्ती, योजनांसाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे लागत आहेत. आतापर्यंत ३९ हजार ५६५ जणांनी नोंदणी केली असून चार हजार ८८६ उमेदवारांना शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे. यंदा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी स्वत:च सायबर कॅफेवर आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत.बॉक्सशाळांमध्ये मेळाव्यातून जनजागृतीविद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी स्वत: आॅनलाईन अर्ज करून शासनाकडे तो सादर करण्यासंदर्भात शाळा-महाविद्यालयांतून जनजागृती केली जात आहे. त्याकरिता पालकसभा, मेळाव्यांचे आयोजन क रण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. विद्यार्थी शिष्यवृत्ती किंवा योजनांपासून वंचित राहू नये, ही दक्षता घेण्याबाबतचे निर्देश शाळा, महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा