शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बीड प्रकरणात दबाव, अजित पवारांकडे राजीनामा सोपवला?; चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:36 IST

धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती.

NCP Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. मात्र मी राजीनामा दिला नसल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

धनंजय मुंडे हे आज बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले होते. यावेळी पत्रकारांकडून राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही." त्यामुळे तूर्तास तरी बीड प्रकरणात अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना अभय दिल्याचं दिसत आहे.

बीडमधील हत्या आणि खंडणी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर काल धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल," असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली.

मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव

संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोमवारी दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आदी उपस्थित होते. 

देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा व पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. देशमुख प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली. परंतु मुख्य गुन्हेगार वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. देशमुख प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड