अहमदनगर : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी सायंकाळी ऐतिहासिक नगरमध्ये दाखल झाले. लष्कराच्या येथील एसीसी अॅण्ड एसमध्ये शनिवारी सकाळी होणाऱ्या ‘प्रेसिडेन्ट स्टॅण्डर्ड’ सोहळ्यासाठी ते आले आहेत. दरम्यान, राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नगरमध्ये स्वागत केले. येथील आर्मर्ड कॉर्प सेंटर अॅण्ड स्कूल (एसीसी अॅण्ड एस) या लष्करी प्रशिक्षण संस्थेत शनिवारी (दि.१५) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते लष्कराचा गौरव होत आहे. स्टॅन्डर्ड अॅण्ड कलर अवॉर्ड सेरेमनी या लष्करातर्फे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष मानके व रंग पुरस्कार देऊन येथील एसीसीएस युनिटचा सन्मान होईल. (प्रतिनिधी)
राष्ट्रपती नगरमध्ये दाखल
By admin | Updated: April 15, 2017 01:33 IST