महायुती निवडणुकीस सज्ज

By Admin | Updated: September 13, 2014 04:54 IST2014-09-13T04:54:36+5:302014-09-13T04:54:36+5:30

विधानसभा निवडणूक जिंकण्यास महायुतीसह भाजपा सज्ज असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

Prepare for the Mahayuti elections | महायुती निवडणुकीस सज्ज

महायुती निवडणुकीस सज्ज

मुंबई : विधानसभा निवडणूक जिंकण्यास महायुतीसह भाजपा सज्ज असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशी घोषणा देत भारतीय जनता पार्टी महायुतीतील साथीदार पक्षांसोबत विधानसभा निवडणूक जिंकण्यास सज्ज आहे, असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची
गंगा वाहू लागली आहे. मोदी यांच्या कल्पनेतील विकास राज्यातही होण्यासाठी येथे त्यांच्याच विचारांचे सरकार आवश्यक आहे. त्यासाठीही राज्यात परिवर्तनाची
गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे मार्गदर्शन, काळाच्या कसोटीवर उतरलेली भक्कम विचारसरणी, राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले समर्पित कार्यकर्त्यांचे जाळे आणि झोकून देऊन काम करणारी तरुण नेतृत्वाची फळी या भाजपाच्या जमेच्या बाजू आहेत.राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला असेच यश मिळेल व राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Prepare for the Mahayuti elections