शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

शरद पवारांना शह देण्याची तयारी, राज्यभरात अजित पवार गटाची मोर्चेबांधणी, केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:19 PM

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांना शह देऊन राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटानं मोठं पाऊल उचललं आहे.राज्यात पक्ष संघटना वाठवण्यासाठी राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली असून, एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे.

या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची जबाबदारी असेल.  अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल पाटील यांच्याकडे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मारावबाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार