शेतकऱ्यांसाठी ‘खळ्ळ खट्याक’ ची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 01:39 IST2015-09-15T01:39:29+5:302015-09-15T01:39:29+5:30
राज्यात दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच मनसेनेही आता या विषयावर आंदोलन करण्याची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये

शेतकऱ्यांसाठी ‘खळ्ळ खट्याक’ ची तयारी
नाशिक : राज्यात दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच मनसेनेही आता या विषयावर आंदोलन करण्याची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करून मनसेच्या स्टाइलने खळ्ळ खट्याक करण्याचे संकेत दिले.
ग्रामीण प्रश्नावर प्रथमच स्वारस्य दाखविणाऱ्या राज यांनी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही जाहीर केले आहे. राज यांनी पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. शेतकऱ्यांनी दुष्काळापासून ते हमी भाव मिळण्यापर्यंतचे मुद्दे मांडले. शेतकऱ्यांशी बोलताना राज यांनी मराठवाड्यातील परिस्थितीला काँग्रेस-राष्ट्रवादीला जबाबदार ठरविले. (प्रतिनिधी)
स्वाभिमानीही पाठिशी : सत्तारूढ पक्षाबरोबर असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठकीस हजेरी लावताना राज यांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी दर्शविली. इतकेच नव्हे तर खा. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून त्यांना राज ठाकरे यांच्या आंदोलनात साथ देण्यासाठी गळ घालण्याची तयारी दर्शवली.
- शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचले, परंतु त्यांनी राजकीय पक्ष काढला तेव्हा त्यांना शेतकऱ्यांनी साथ का दिली नाही, असा प्रश्न करून त्यांनी शेतकऱ्यांच्या राजकीय दुटप्पी भुमिकेमुळेच त्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले.