त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता

By Admin | Updated: August 4, 2016 21:21 IST2016-08-04T21:21:18+5:302016-08-04T21:21:18+5:30

येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात

Preparation of Government System at Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता

त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता

ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर, दि. ४ : येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या.

त्र्यंबकेश्वर येथे चारही सोमवारांबरोबरच संपूर्ण महिनाभर भाविकांचा ओघ राहणार असल्याने भाविक एसटी बस, खासगी वाहने अन्य प्रवासी बस आदिंचा वापर करून श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकला येत असतात. या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर वाहनांचे नियोजन, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आदि कामांसाठी सर्वात जास्त ताण येतो. हे सर्व करण्यासाठी जादा पोलीस बळ असावे लागते. सर्व खासगी वाहने खंबाळे, अंबोली, पहिने व तळवाडे वाहनतळावर थांबविण्यात येतील व तेथून बसने शहरात स्वतंत्रपणे एस.टी. बसने येता येईल.

गावात कुठलेही वाहन आणता येणार नाही, मात्र एसटी बस शहरात येतील हे नियोजन फक्त श्रावण सोमवारी असेल. बाकी जशी गर्दी वाढेल तसे नियोजन असेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. परिक्रमा फेरी मार्गावरदेखील पुरेसा बंदोबस्त असेल. त्यामुळे केवळ हौसेखातर व फेरीच्या नावाखाली येणारे, नशिले, मादक पदार्थ सेवन करून ‘पिकनिक’साठी व छेडछाड करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची आरोग्य व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातर्फे घेण्यात येईल. पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी रुग्णालयात असलेल्या नियमित तीन वैद्यकीय अधिकारी-१, वैद्यकीय अधीक्षक-१ व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असेल तर तिसऱ्या सोमवारी मात्र चार ठिकाणी फिरते आरोग्य पथक तैनात करण्यात येईल. या शिवाय पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल. त्र्यंबक नगरपालिका व मजीप्रातर्फे थोडा क्लोरिनचा डोस वाढविण्यात येईल. 


सर्व यंत्रणांनी सतर्क राहून श्रावण सोमवार यशस्वीपणे पार पाडावेत, असे आवाहन नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी केले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने कुशावर्त तीर्थावर जवळपास २५ जीवरक्षक असणार आहेत. त्यामुळे कुशावर्तावर सहसा बुडण्याचा धोका राहणार नाही. तरीदेखील भाविकांनी दोरीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. येत्या ११ आॅगस्टला सिंहस्थ पर्वकाल संपणार असल्याने पहिल्या सोमवारी, मंगळवारी व बुधवारी कदाचित भाविकांची सिंहस्थ स्नानासाठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाने मात्र श्रावण नियोजनाची पूर्णपणे जय्यत तयारी केली आहे. यावेळी नगरसेवक, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर मंदिर, जव्हार फाट्यावरील बसस्थानक, सापगाव फाटा (जेथून फेरीचा परतीचा मार्ग आहे) व कुशावर्त तीर्थ या ठिकाणी फिरते आरोग्य पथक असेल. १०८ रुग्णवाहिका येथील दोन रुग्णवाहिकेसह नऊ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे त्यामुळे कोणतीच गैरसोय होणार नाही. जादा वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पुरेसा औषधसाठा, रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची व्यवस्था असेल, अशी माहिती डॉ. भागवत लोंढे यांनी दिली. त्र्यंबक पालिका गावातील स्वच्छता, पथदीप, पुरेसे पाणी आदि जबाबदारी पार पाडणार आहे. अधिकारी आदि फिरणार असल्याने भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही.

एस.टी. महामंडळातर्फे तिसऱ्या सोमवारव्यतिरिक्त नेहमीच्या टायमिंग १५० गाड्यांव्यतिरिक्त ५० जादा बसेस रविवार, सोमवार या दोन दिवसांत सोडण्यात येतील. तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्यावरील बसस्थानक सुरू करून तेथूनच गाड्यांचे नियोजन केले जाईल, अशी माहिती शरद
झोले यांनी दिली. ते म्हणाले, भाविकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, पुरेशा बसेस उपलब्ध आहेत.

पोलिसांची अधिक कुमक
त्र्यंबक पोलिसांनी केलेल्या नियोजनासाठी वरिष्ठांकडे पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी एक पोलीस उपअधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ३००- पोलीस कर्मचारी, ७५ महिला पोलीस कर्मचारी, २०० पोलीस कर्मचारी, तर तिसऱ्या श्रावण सोमवारी चार पोलीस उपअधीक्षक, १६ पोलीस निरीक्षक, ६४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ७०० पोलीस कर्मचारी, त्यात महिला पोलीस कर्मचारीदेखील असतील व ३०० होमगार्ड्सची मागणी केली आहे.

Web Title: Preparation of Government System at Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.