मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप करणारी प्रीती जैन ठरली दोषी
By Admin | Updated: April 28, 2017 14:14 IST2017-04-28T13:42:32+5:302017-04-28T14:14:15+5:30
प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अभिनेत्री प्रिती जैनला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप करणारी प्रीती जैन ठरली दोषी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मॉडेल प्रिती जैनला दोषी ठरवले आहे. याच प्रिती जैनने मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप केला होता. मधुर भांडारकरांनी चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन आपले लैंगिक शोषण केले असा आरोप तिने केला होता 2005 मध्ये भांडारकर यांच्या हत्येसाठी गँगस्टरना पैसा दिल्याचा प्रिती जैन आणि अन्य दोघांवरील आरोप सिद्ध झाला.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला भांडारकरांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली प्रिती जैनला अटकही झाली होती. गवळीच्या एका साथीदाराला तिने 70 हजार रुपये दिले होते. प्रिती जैनने त्याआधी मधुर भांडारकरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून भांडारकरांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला होता.
चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात भांडारकरांनी आपल्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली असा तिचा आरोप होता.भांडारकरांनी तिला पाठवलेले एसएमएसही तिने पुरावा म्हणून दाखवले होते.
Preeti Jain and two others have been convicted by a Mumbai court, while two others have been acquitted in the case
— ANI (@ANI_news) April 28, 2017
Actor Preeti Jain and two others, convicted by a Mumbai court for giving money to gangsters to kill Madhur Bhandarkar in 2005
— ANI (@ANI_news) April 28, 2017