शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला : व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांना पुन्हा स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 13:10 IST

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासक्रम सुरू होणे अपेक्षित असताना यावर्षी काही तांत्रिक कारणांमुळे या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे.

ठळक मुद्देतंत्र शिक्षण संचालनालयाचा हलगर्जीपणाइंटर्नशिपसाठीसुद्धा वेळ मिळणार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे

पुणे : व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आजूनही संपली नाही. पुन्हा या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासक्रम सुरू होणे अपेक्षित असताना यावर्षी काही तांत्रिक कारणांमुळे या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी २८ ऑगस्टला होणार आहे. मुंबईतील जमनालाल बजाज महाविद्यालयात प्रवेशाबद्दल झालेल्या गोंधळामुळे आणि तंत्र शिक्षण संचालनालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बजाज महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रवेश देणे आवश्यक होते. परंतु स्थानिक विद्यार्थ्यांना ७० टक्के जागा आरक्षित करून प्रवेश दिले. त्यामुळे इतर विद्यपीठांतील विद्यार्थ्यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु यापूर्वीदेखील सुनावणीच्या तारखा मिळाल्या असून, दिलेल्या तारखेलाच सुनावणी होईल याची कोणतीही शाश्वती नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या व्यवस्थापकीय अभ्यासक्रमाबरोबर असलेल्या ‘व्यवस्थापकीय पदविका’ (पीजीडीएम) अभ्यासक्रमाच्या तासिका सुरु होऊन एक महिना झाला आहे. आमच्या प्रवेशाबद्दल अजून काहीच हालचाल नाही. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या सुनावणीनंतर जरी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली तरी अभ्यासक्रम सुरु व्हायला १५ दिवस लागतील. डिसेंबर महिन्यात परीक्षा असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्याला दीड महिनाच मिळेल. यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण होऊच शकत नाही. तसेच इंटर्नशिपसाठीसुद्धा वेळ मिळणार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ........* अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. परंतु आता तीन महिन्यांपासून त्यांना घरीच बसून राहावे लागले आहे. * काही विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज देखील काढले आहे. त्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.  .......* गेली तीन महिने आम्ही या प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळात अडकलेले आहोत. आजही आम्हाला प्रवेशाबद्दल काहीच शाश्वती मिळालेली नाही. या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना अनेक ट्विट आणि ई-मेल केले आहेत परंतु त्यांनी कशालाही उत्तर दिलेले नाही. - योगेश गुजर, विद्यार्थी आम्हाला प्रवेशप्रक्रियेसंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. महाविद्यालयाला विचारले तर त्यांना काहीच कल्पना नसते. तंत्रशिक्षण विभागाच्या मदतकार्य संपर्कावर फोन केला तर एकही नंबर चालू नाही.  - शर्वरी राज, विद्यार्थिनी 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणGovernmentसरकारCourtन्यायालय