शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीचं प्रेम प्रकरण, महिलेनं प्रियकराला भेटायला बोलावलं आणि पतीसोबत मिळून संपवलं, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:53 IST

Crime News: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे प्रेम प्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेनं तिच्या पतीसोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे प्रेम प्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेनं तिच्या पतीसोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हा तरुण होळी साजरी करण्यासाठी गावी आला असताना या महिलेनं त्याला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पतीसोबत मिळून धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपी पती पत्नीला अटक केली आले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सागर वानखेडे असे हत्या झालेल्या  तरुणाचे नाव आहे. तर राजू गजभिये आणि सोनाली गजभिये अशी आरोपी पती-पत्नीची नावे आहेत. मृत सागर वानखेडे आणि आरोपी महिला सोनाली गजभिये यांचे लग्नाआधीपासून प्रेम प्रकरण सुरू होते. तसेच लग्नानंतरही दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. याचदरम्यान, होळीनिमित्त सागर वानखेडे हा गावी आला होता. तेव्हा सोनाली जगभिये हिने त्याला भेटण्यासाठी बोलावले.

सोनालीने बोलावल्यानुसार सागर हा आज सकाळी १०च्या सुमारास भेटण्यासाठी आला. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून निघाले. यादरम्यान, पर्स खाली पडल्याचे नाटक करून सोनालीने दुचाकी थांबवायला लावली. तसेच संधी साधून लपवून आणलेल्या चाकूने सागरवर वार केले. तेवढ्यात सोनालीचा पती राजू हा सुद्धा तिथे पोहोचला आणि त्याने सागरवर चारूने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळे सागरचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपी राजू आणि सोनाली गजभिये हे आत्मसमर्पण करण्यासाी पोलीस ठाण्यात जात असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच पकडले. तसेच पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Affair leads to murder: Wife and husband kill lover.

Web Summary : In Nagpur, a woman and her husband murdered her former lover. The woman lured him to a meeting, where they fatally attacked him with knives. Police have arrested the couple; investigation ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरrelationshipरिलेशनशिप