शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 18:25 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यावर ठाम आहेत.

मुंबई - अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेला आरेतील वृक्षतोडीचा मुद्दा कालपासून पुन्हा एकदा पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यानंतर लगेचच संध्याकाळी आरेतील झाडं तोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा आरेचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. याप्रकरणी सिनेअभिनेता आणि मुळशी पॅटर्न फेम प्रविण तरडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. तरडेंनी आरेतील वृक्षतोडीचे समर्थन करत विरोध करणाऱ्यांना टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यावर ठाम आहेत. तर शिवसेनेनं या प्रकल्पाला असलेला विरोध वारंवार बोलून दाखवला आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे. या प्रकरणात आता प्रविण तरडेंनीही उडी घेतली आहे. 

''पुण्यातून मुंबईत राहायला गेलेले बरेच नाटक सिनेमावाले म्हणतायेत झाडे का कापतायेत? मग काय तुम्ही घेतलेली घरे पाडून मेट्रो करायची का ? वाढलेली गर्दी जबाबदार आहे'' असे म्हणत प्रविण तरडेंनी मेट्रो कारशेड साठी पाडण्यात येणाऱ्या झाडांचे समर्थन केले आहे. मेट्रोचा प्रकल्प उभारणीसाठी ते गरज असल्याचं सूचवताना, आपल्या सिनेकलाकार मित्रांवर प्रविण यांनी टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मात्र मेट्रोचं कारशेडचं आरेमध्ये उभारण्यावर ठाम आहेत. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक वेगवान होईल. जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोतून प्रवास केल्यावर प्रदूषण होईल, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPravin Tardeप्रवीण तरडेAarey ColoneyआरेMumbaiमुंबईBJPभाजपाShiv Senaशिवसेना