...तर आम्ही शिवसेनेच्या 'त्या' निर्णयाचं स्वागतच करू : प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 12:46 PM2020-02-16T12:46:08+5:302020-02-16T13:04:10+5:30

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे.

Praveen Darekar said that Shiv Sena's role was welcome | ...तर आम्ही शिवसेनेच्या 'त्या' निर्णयाचं स्वागतच करू : प्रवीण दरेकर

...तर आम्ही शिवसेनेच्या 'त्या' निर्णयाचं स्वागतच करू : प्रवीण दरेकर

Next

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेनं नाणारविरोधाची धार तीव्र करत प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. मात्र सत्तेत येताच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे शिवसेनेनं यू-टर्न घेतल्याची चर्चा कोकणात सुरू झाली आहे. तर शिवसेनेची नाणारच्या बाजूनी भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो, असा खोचक टोला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यानी लगावला आहे.

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. 'रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच', असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे.

तर याच जाहिरातीवर बोलताना दरेकर म्हणाले की, नाणारच्यासंदर्भात अत्यंत टोकाची भूमिका शिवसनेने घेतली होती. परंतु शिवसेनेच मुखपत्र असेलल्या सामनामधून नाणार प्रकल्प कसे चांगले आहे, अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसनेने नाणारच्या बाजूची भूमिका घेतली की काय असे मला वाटत असून, असे असेल तर त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो, असे दरेकर म्हणाले.

तसेच नाणार या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार असून अनेकांना व्यवसाय सुद्धा मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले. तर कुठल्याही प्रकाराची पर्यावरणाची हानी न होता, जर कोकणची आर्थिक उन्नती या माध्यामतून होणार असेल तर कोकणवासियांना यावर कोणतेही आक्षेप नाही. मात्र काही मूठभर लोकं सोडली तर याला विरोध नाहीच असेही दरेकर म्हणाले.

 

 

 

 

 

Web Title: Praveen Darekar said that Shiv Sena's role was welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.