शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

Maharashtra Politics : 'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:40 IST

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काल काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला. यानंतर सायंकाळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया देत नवीन दावा केला आहे. रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचा दावा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला. 

Maharashtra Politics: संदीप क्षीरसागरांच्या अडचणी वाढल्या; तहसीलदारांना धमकावल्याचा कॉल व्हायरल

खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )  यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. खासदार राऊत म्हणाले, रविंद्र धंगेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत, पण त्यांनी मी विकास कामे करण्यासाठी शिंदे गटात जात असल्याचं सांगितलं आहे. त्यांची कोणती शैक्षणिक की समाज उपयोगी कामे थांबली आहेत म्हणून निघाले आहेत? शिंदे गटात, अजित पवार यांच्या पक्षात हे जे प्रवेश सुरू आहेत हे प्रवेश भितीपोटी सुरू आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

"स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी भीतीपोटीच पक्षांत्तर केलं आहे, अजित पवार आणि त्यांच्या लोकांनीही भीतीपोटीच पक्षांत्तर केलं आहे. एखाद्याने पक्षप्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते. ही एक सिस्टीम राबवली जात आहे. रविंद्र धंगेकर खरेखर का गेले हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरुन सांगायला पाहिजे. खरोखर कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेत एक जागा आहे, ही प्रतिभा रविंद्र धंगेकर आणि पार्टनर इतरांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत ६० कोटी रुपये आहे. ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकी काळात भाजपाने मुस्लिम समाजातील काही लोकांना हाताशी धरुन भाजपाची लोक कोर्टात गेले. त्यात त्यांचं काम अडवण्यात आले,  प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली, असा मोठा आरोप खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )  यांनी केला.

... म्हणून ते शिंदे गटात गेले 

'मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे, यात मराठी माणसांनी गुंतवणूक केली आहे. धंगेकर यांच्याबरोबर जे पार्टनर आहेत ते भाजपाचे माजी नगरसेवक आहेत. त्यामध्ये मनसेच्या एका माजी नगरसेवकाची पत्नी सुद्धा आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणूकीत त्यांची कोंडी करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीच्या अटकेच्या भीतीने आमचे प्रिय रविंद्र धंगेकर शिंदे गटात गेले आहेत, वायकरांसारखेच धंगेकर यांचे प्रकरण आहे, असा दावाही संजय राऊत ( Sanjay Raut )  यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाravindra dhangekarरविंद्र धंगेकरEknath Shindeएकनाथ शिंदे